Mpsc Essay

785 Words4 Pages
MPSC स्पर्धा परीक्षा: आठ विनिंग स्टेप्स * कार्य कुठलेही असो, त्याची चांगली सुरुवात होणे महत्त्वाचे असते. सुरुवात चांगली झाली म्हणजे तुम्ही विजयी झालाच समजा. कार्याचे यश कार्याच्या सुरुवातीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्याचा शेवटही चांगलाच होत असतो. शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणारे तसेच स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्‍यांचीही सुरुवात चांगली झाली तर भविष्‍यात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. अभ्यास अथवा एखाद्या कामात यश मिळण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत. त्यांना आपण 'आठ विनिंग स्टेप्स' म्हणू शकतो. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसाठीही या स्टेप्स मार्गदर्शक ठरू शकतात. 1) स्टार्ट अर्ली : चांगली सुरुवातीमध्येच कार्य यशाकडे वाटचाल करत असते तसेच कार्याचा शेवटही गोड होत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच तयारी सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग तसेच विविध क्षेत्रातील परीक्षा देताना अडचणी निर्माण होत नाही. विशेष म्हणजे इंग्रजीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण घेत असतांना टीव्हीवरील बातम्या पाहाणे, वृत्तपत्र वाचणे फायदेशीर ठरते. जगासोबत आपण स्वत: अपडेट राहिल्याने नवीन संदर्भ कळतात. देश- विदेशातील घडणार्‍या घटनांचा होणारा परिणाम तसेच प्रभाव अभ्यासणेही महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमधून उमेदवारांचे सर्वकष ज्ञान तपासले जात असते. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा 'शॉर्टकट' न वापरता मन:पूर्वक अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांत स्वत:ला गुंतवूण घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. 2) बॅक टू द बेसिक्स: आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्या विषयाची विविध प्रकाशनांची आठवी ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके चाळली पाहिजे. प्रत्येक विषयाची मूलभूत माहिती ही त्या विषयाचा पाया असते. त्यामुळे प्रत्येक विषयाची प्राथमिक माहितीही असणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा इयत्ता दहावी पर्यंतचा असतो. 3) बुद्धिमत्ता, वाचन आणि सामान्यज्ञान:

More about Mpsc Essay

Open Document